DNA मराठी

राज ठाकरे यांना सुप्रिया सुळेंनी दिला उत्तर; म्हणाले शरद पवारांचं नाव ..

0 624
Supriya Sule lashed out at Navneet Rana's role and said, "Shall I tell you the truth?" ..
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोपी शरद पवार यांच्यावर केले आहे.
Related Posts
1 of 2,482
 राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून देखील राज ठाकरे यांना उत्तर देण्यात येत आहे.  आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी देखील राज ठाकरे यांना उत्तर देत खोचक पद्धतीने निशाणा साधला आहे.  राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केलीय. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पत्रकाराने राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन टीका केल्याचं सुप्रिया यांना सांगत पुढील प्रश्न विचारला. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवरांना अशापद्धतीचं राजकारण केल्याचं ते म्हणाले, असं सुप्रिया यांना विचारण्यात आलं असता त्यावरुन. त्यांनी मोजक्या शब्दात राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांचे नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते. याचा उपयोग जर पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: