पोलीस अधीक्षकांचा दणका ,अखेर पाटील निलंबित …………..

0 15
 अहमदनगर  –   भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 च्या गुन्ह्यात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. तर भिंगार पोलीस ठाणाच्या पदभार सध्या नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे देण्यात आला आहे.
 २०१७ मध्ये रमेश काळे याचा मुत्यू  झाला होता त्या नंतर भिंगार पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मुत्यूचा गुन्हा दाखल झाला होता . त्यावेळेस मयत काळेच्या नातेवाईकाने  मारहाणीत मुत्यू झाल्याचा आरोप केला होता. तत्कालीन डी वाय एस पी  चिन्मय पंडित यांनी आरोप झाल्यामुळे काळे यांच्या मुत्यूदह  पोस्टमाटम साठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.  तीन वर्षानंतर या प्रकरणाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता.  त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके नगर विभाग यांनी जा.क्र. 2799/2019 दि.14/05/2019 रोजी सादर केलेली होते. त्यांनी तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता भा.द.वि. 302, 328, 323, 34 प्रमाणे आरोपी शिक्षापात्र ठरतो असा अभिप्राय दिला. त्यानंतर 2019 नंतर  20 डिसेंबर 2019 ला अखेर या गंभीर गुन्हा दाखल झाला.

 

जमीन खरेदीत इसमाची १ कोटी ५५ लक्ष रुपयांना फसवणूक..

Related Posts
1 of 1,301
या प्रकरणातील या प्रकरणात मयताची पत्नीने जबाबात म्हटले आहे.  या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तिने सांगितले.  दि. 21/02/2017 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी माझा नवरा रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे व मुले असे आमचे पञ्याच्या शेडमध्ये असतांना बाहेर मोटारसायकल आल्याचा आवाज आला. माझ्या नव-यास हाक मारुन घराबाहेर येण्यास सांगितले. तेव्हा मी व माझा नवरा रमेश उर्फ रमाकांत घराबाहेर गेलो असता, यावेळी घराबाहेर तीन लोक आले होते. ते लोक मला व माझ्या नव-यास म्हणाले, आमच्याकडे मोठी बकरी मेलेली आहे. तुम्ही आमचे सोबत घेण्यास चला असे म्हणाल्याने मी व नवरा रमेश त्यांचे एका मोटार सायकलवर बसले. दुस-या मोटार सायकलवर नवरा असे आम्ही त्यांचे मोटारसायकलवर बसून ते आम्हाला काटवनात घेऊन आले. आम्ही काटवनात गेलो तेव्हा आमचे ओळखीचा असलेला जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली भिंगार ता. जि. अहमदनगर) हा तेथे थांबलेला होता.

 

                                 निलेश राणे यांना आपल्या स्टाईलने अजित पवार यांनी दिला हा भन्नाट उत्तर

३० डिसेंबर २०२०ला पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे  भिंगार पोलीस ठाण्याचे निरीक्षणासाठी गेले असता त्यांना इतका गंभीर गुन्हा अकस्मात मुत्यूचा नोंदीत  सापडला त्यानंतर पोलीस अधिक मनोज पाटील यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते . मात्र  प्रवीण पाटील यांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा केल्याने  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: