भिंगार पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षका दणका, दादापाटील अखेर सुट्टी वर

0 13

अहमदनगर –   भिंगार पोलीस ठाण्यातील हद्दीमधील मोमिनी गल्ली येथे बकऱ्या चोरण्याच्या कारणावरून रमेश सफरचंद काळे यांना जावेद शेख याच्यासह तीन जणांनी मारहाण करून विषारी दारु पाजून खून करणारे आराेपी अजूनही खुलेआम फिरत आहेत. या प्रकरणावर पडदा पडण्याचे मुख्य कारण हिऱ्याचा झगमगाट असल्याची चर्चा सध्या भिंगारसह परिसरात सुरु होती .  या प्रकरणाची  चौकशी होणार या भीतीने भिंगार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि आरोपीला पाठीशी घालणार पोलीस दादा सुट्टीवर गेल्याचे समजते .

काळे यांच्या खून प्रकरणात हिऱ्याची तस्करी करणाऱ्या माेठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. या हिऱ्याच्या व्यापाऱ्यांची कॅम्प पाेलिस दरबारी नेहमीच उठबस होत असते.  या हिऱ्याच्या व्यापाराने अनेकांच्या खिशांवर रंगीबेरंगी नाेटींनी खिसे लालेलाल करून टाकलेले आहे. त्यामुळे काळे कुटुंबिय गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळण्यासाठी लढा देत असले तरी पाेलिसांकडून त्याकडे डाेळे झाकच सुरु होती. काळे प्रकरणातील या हिऱ्यावर या अगाेदरही अनेक प्रकारचे  आराेप झाले होते  पाेलिस प्रशासन त्याच्या चलती मुळे सध्या माैन बाळगून आहे.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी या प्रकरणात ३०२ सारख्या जुन्या या गुन्ह्यातील आरोपी पात्र असल्याचा अहवाल रंजनकुमार शर्मा पोलिस अधीक्षक असताना पाठवला होता मात्र त्याला स्थानिक पोलिसांनी केराची टोपली दाखवली होती पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यानंतर नव्याने हात झालेले पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढण्यास सांगितली होती.

 शरजील नावाच्या कारट्या ला अटक किवा चौकशी होणार नसेल तर…- नितेश राणे

त्यावेळेस भिंगार पोलीस ठाण्यातील आकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या शाळेत प्रकरणातील जो अहवाल आला होता तो अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांनी दाबून ठेवल्याची माहिती समोर आली होती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा गुन्हा दाखल का  झाला नाही ?  याबाबत विचारणा केली असता पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना याबाबत कुठलेही समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार ३०२ चा गुन्हा दाखल करा मात्र गुन्हा दाखल होऊ नये स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे डोळे झाक केली आणि ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुन्हा सोडून देण्यात आले.

Related Posts
1 of 1,292

                                                  श्रीगोंदयात मटक्यात पोलीस भागीदार ….. ?

याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली आहे आपल्यावर कारवाई होणार याचे संकेत मिळतात या पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जवळचा दादाने भाऊच्या एका अधिकाऱ्यामार्फत फ़िल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही, आपल्यावर कारवाई होणार या भीतीने भिंगार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गुटका व्यवसायिकांनी बरोबर अनेक वर्षापासून संबंध असलेला दादानेही ही सुट्टी टाकली आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करणारा याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे .

शरजील नावाच्या कारट्या ला अटक किवा चौकशी होणार नसेल तर…- नितेश राणे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: