महाराष्ट्रासह ‘या’ दहा राज्यांमध्ये बसणार उन्हाचा चटका; हवामान विभागाने दिला इशारा

0 223
The heat wave continues in the state; Heat wave in 'this' area in The heat wave continues in the state

 

दिल्ली  –  देशातील सुमारे 70 टक्के लोकसंख्येपैकी 80 टक्के जनता उन्हाच्या तडाख्याने होरपळत आहे. येत्या काळात उन्हाचा तडाखा आणि त्रास वाढणार आहे. मे महिन्यात तापमान 48 अंशांपर्यंत पोहोचू शकते. यासोबतच उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि झारखंड या 10 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पुढील चार दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, भारत उन्हाळ्याच्या तीव्र कालावधीतून जात आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, यूपी, राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि ओडिशाच्या काही भागात तापमान 45 अंशांपेक्षा जास्त पोहोचले आहे. पुढील पाच दिवस देशातील मोठ्या भागात उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पुढील तीन दिवस तापमानात सुमारे 2 अंशांनी वाढ होईल. मग काही आराम मिळेल अशी आशा आहे. आयएमडीने म्हटले आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

 

Related Posts
1 of 2,439

गेल्या 10 वर्षात कमाल तापमान 45 च्या पुढे गेलेल्या झाशीमध्ये 27 आणि 28 एप्रिल रोजी दिवसाचे तापमान 45.6 अंशांवर नोंदवले गेले. 17 एप्रिल 2010 रोजी येथे सर्वाधिक तापमान 46.2 अंश नोंदवले गेले. कानपूरमध्ये गुरुवारी पारा 45.8 अंशांवर पोहोचला. नऊ वर्षांपूर्वी 30 एप्रिल 2013 रोजी येथे कमाल पारा नोंदवला गेला होता. प्रयागराजमध्ये पारा 45.9 अंशांवर नोंदवला गेला.

 मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाची शक्यता
आयएमडीने म्हटले आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
मार्च हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना
हवामान खात्यानुसार, या वर्षीचा मार्च हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला. या कालावधीत 71% कमी पाऊस झाला. गव्हाच्या उत्पादनात 35% पर्यंत घट

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: