
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला होता. वकील सतीश उके हे सातत्यानं भाजपच्या विरोधात बोलतात. तर त्यांच्याकडे बीजेपी विरोधात पुष्कळ माहिती आहे. ती घेण्यासाठी कारवाई केली असावी अस मत त्यांनी मांडलंय.केंद्रीय यंत्रणेचा वापर लोकशाहीला दडपण्यासाठी केला जात असेल तर ते चुकीचं आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय.
तसेच ज्या कारवाया होत आहे त्यामुळे ईडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावी लागेल अशी उपरोधिक टीका रोहित पवारांनी केलीय. तसेच जातीय तेढ निर्माण होता कामा नये, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलं. (Sujay Vikhe in discussion again; Said, ..so we turn around in a minute)