फिल्म इंडस्ट्रीमधील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची आत्महत्या

0 635

  बंगळुरू –    कन्नड फिल्म इंडस्ट्री (Kannada Film Industry) मध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे.   लोकप्रिय अभिनेत्री सौजन्याने  (ActressSoujanya) बंगळुरू (Bangalore) येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.   कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या अभिनेत्री जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) आणि चैत्र कूटूर (Chaitra Kootur) ने  काही दिवसांपूर्वीच  आत्महत्या केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ सौजन्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.(Suicide of another popular actress in the film industry)

अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या  करण्यापूर्वी एक सुसाईट नोट (Suicide note) लिहिली आहे.  या नोट मध्ये तिने आपल्या आत्म्हत्याला  कुणीही जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. तसेच या नोटच्या माध्यमातून तिने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून सौजन्या नैराश्याचा सामना करत होती. यासंदर्भातील माहिती तिने नोटमध्ये दिली आहे. या प्रकरणी पोलीस सौजन्याचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रीणींची चौकशी करत आहेत. नोटमध्ये सौजन्याने तिला कोणताही आजार नसल्याचे म्हटले आहे पण तणावात असल्याचे तिने सांगितले. या कठीण काळात मदत करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत.
Related Posts
1 of 96
सौजन्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.सौजन्याने आजवर अनेक दाक्षिणात्य मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सोबत काम करणाऱ्या लोकांची देखील चौकशी पोलीस करत आहेत.(Suicide of another popular actress in the film industry)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: