कर्जाला कंटाळून एकाच कुंटाबातील तीन जणांची गळफास घेवुन आत्महत्या…

0 615
 अहमदनगर –   शहरात एकच खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. केडगाव परिसरात कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घरी पती,पत्नी आणि एका दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटना स्थळी दाखल झाली असून तीनही शव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली असून शवविच्छेदन केले जात आहे.
Related Posts
1 of 1,481
या प्रकारात मिळालेली अधिक माहिती अशी कि केडगांव येथील विठ्ठल कॉलनी,मोहिनी नगर येथे राहणारे संदिप दिनकर फाटक (वय 40), पत्नी किरण संदिप फाटक (वय 32),मैथिली संदिप फाटक (वय 10 )असे आत्महत्या केलेल्या मयतांची नांवे आहेत. पोलिसांना त्यांच्या घरातून एक सुसाईड नोट देखील प्राप्त झाला आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांना ही घटना लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोतवाली पोलीस घटना स्थळी दाखल झाली. कोतवाली पोलिसांनी  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: