14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, एकाच आठवड्यात चार आत्महत्या

0 284

पुणे –  पुणे शहरातील येरवडा परिसरात एका 14 वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.रिचा दिलीप देवकर (वय 14, रा. चित्रा चौकाजवळ येरवडा) असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या मुलीचे नाव आहे. अद्याप रीचाने आत्महत्या का केली याच कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी येरवडा (Yerawada) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपाससुरूकेला आहे.  येरवड्यात एकाच आठवड्यात चार आत्महत्येच्या घटना घडलेल्या असल्याने आणखी चिंतेत भर पडली आहे.(Suicide by strangulation of 14-year-old girl, four suicides in one week)

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास कंजारभाट वसाहती समोर चित्रा चौकात एका घराच्या पहिल्या मजल्यावर एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता रिचा हिने पहिल्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिचाच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

Related Posts
1 of 1,463

दोन दिवसापूर्वी तिचे आईवडील त्यांच्या गावी गेले होते. भाऊ व ती दोघेच घरी होते. भाऊ घराबाहेर गेल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. रिचाने आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.(Suicide by strangulation of 14-year-old girl, four suicides in one week)

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: