अचानक फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

0 231
 तमिळनाडू-  थोड्या दिवसातच दिवाळी ( Diwali)  हा सण (Festival) संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्साहासाठी व्यवसायिक वर्गाने देखील आपली तयारी पूर्ण केली आहे. मात्र तमिळनाडूतील (Tamil Nadu) कालाकुरिची (Kalakurichi) येथील शंकरपूरम (Shankarpuram) परिसरात दिवाळीपूर्वी फटाक्यांची (firecracker) पॅकिंग सुरू असताना अचानक आग लागल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे.गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या ज्वाळा आणि धूर कित्येक किलोमीटर लांबून दिसत होता. तसेच आगीनंतर फटाक्यांचा ही स्फोट होत होता. या दुर्घटनेत पाच जणांचा  मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. (Sudden fire at a firecracker warehouse, killing five people)

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना तमिळनाडू सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना एक लाख रुपयांची आर्थिक महदत जाहीर करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस यांचा चाहत्यांसाठी लवकरच नवीन गाणं भेटीला

Related Posts
1 of 1,487

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिवाळीमुळे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टॉक ठेवण्यात आला होता. मंगळावारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनमधून धूर येत असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच संपूर्ण गोडाऊनला आग लागली.  फटाक्यांचा एकत्र स्फोट होत असल्याने संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत पाच जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर इतर 9 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी पीएन श्रीधर यांनी दुजोरा दिला आहे.(Sudden fire at a firecracker warehouse, killing five people)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: