महादजी शिंदे विद्यालयात विद्यार्थी गिरवतायत आधुनिक शेतीचे धडे

0 13
 श्रीगोंदा :-  रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याची प्रदर्शन व विक्री करण्यात आली. देशभरातील शंभर अग्रेसर कंपन्या व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फाली’ (FAALI) ‘भविष्यातील शेतीचे नायक’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना श्रीगोंदा शहराचा मध्यवर्ती असणाऱ्या महादजी शिंदे विद्यालय उभारलेल्या  शेडनेटमध्ये शेतीचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता जैविक व पूर्णतः भारतीय पद्धतीने येथे शेती केली जाते. त्याचे विद्यार्थी निरीक्षण करतात .
अभ्यासपूर्ण संशोधन करून नवीन शोध लावतात. गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरील प्रदर्शनात ‘आधुनिक खुरपे’ आणि ‘ड्रॅगाज्यूस’ हे दोन नावीन्यपूर्ण उत्पादने संशोधन सादर केली  त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.अशा या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कृषी क्षेत्रात काम करत असताना होणार आहे. गतवर्षी या उपक्रमात 15 प्रकारच्या गुलाब रोपांची लावणी करून उत्पादन घेण्यात आले होते . यावेळी मेथी, शेपू व कोथिंबीर या पालेभाज्यांचे उत्पादन घेतले गेले. उत्तम नियोजन व उत्कृष्ट दर्जा हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
या उपक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख शिवाजी थिटे व किशोर सोलाट यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदविला. विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, उत्तर विभागाचे अधिकारी तुकाराम कन्हेरकर, संस्थेचे सचिव संजय नागपुरे हे वेळोवेळी या उपक्रमास मार्गदर्शन करतात.
या उपक्रमाचे स्थानिक स्कूल कमिटीचे तुकाराम दरेकर रवी दंडनाईक तसेच पालक आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: