दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशसाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू

0

पुणे –   दि. १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला . या निकालात ९९. ९५ टक्के विध्यार्थी पास झाले आहे तर ४ हजार ९२२ विधार्थीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. (Students start preparing for 11th admission after 10th result)

तर या निकालानंतर आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अकरावीच्या प्रवेशासाठी तयारी सुरु केली आहे.  यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासावर आधारित सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही सीईटी परीक्षा ऐच्छिक असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, वेळापत्रकाबाबतची स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली घेतली जाणार असून, परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.

पंकजा मुंडे यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर – रामदास आठवले

Related Posts
1 of 1,153

राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या १६ लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.(Students start preparing for 11th admission after 10th result)

एसएससीने जाहीर केली जीडी कॉन्स्टेबलची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: