गुटखा चोरी प्रकरणात अधिकारी कर्मचारी सुटका घेण्यासाठी धडपड? अनेक चर्चांना उधाण

श्रीगोंदा :- श्रीगोंदा काष्ठी रोडवर हॉटेल अनन्या जवळ ८ एप्रिल रोजी पोलिसांनी गुटखा पकडला त्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर टिकेची झोड उठल्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस शिपाई अमोल अजबे यांची तडकाफडकी मुख्यालयी बदली केल्यावर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणात आपली सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे.
श्रीगोंदा काष्ठी रोडवर गुटखा पकडल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वच स्तरातून टिकेची झोड झाल्यानंतर नाशिक परीक्षेत महानिरीक्षक यांच्या आदेशाने अहमदनगर पोलीस यांच्या मार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश झाल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी यांचे गोपनीय जबाब नोंदविण्यात आले त्यानंतर अहवाल सादर होण्याच्या आगोदर अहमदनगर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस शिपाई अमोल अजबे यास पोलीस मुख्यालय अहमदनगर या ठिकाणी जमा करण्यात आले मात्र यानंतर सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी याचे या प्रकरणातून आपली बाजू सावरण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत यामध्ये श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील आणि कर्जत पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात धडपड करताना दिसत आहे.
बाकी आरोपी पोलीस कधी अटक करणार ?
श्रीगोंदा पोलिसांनी गुटखा कारवाई केल्यावर अटक केलेल्या बनावट आरोपीने काही लोकांची तसेच काही पोलीस कर्मचारी यांची नावे घेतली होती तसा जबाब पोलीस ठाण्यात घेतला असून याबाबत तपासी पोलीस अधिकारी यांना नेमके कधी सहआरोपी करून ताब्यात कधी घेणार अशी खुलेआम चर्चा होताना दिसत आहे.
गुटख्यातून सुटका होणार का ?
गुटखा प्रकरणात पोलीस शिपाई अमोल अजबे यांची बदली झाल्यावर आपले नाव येऊ नये यासाठी काही पोलीस अधिकारी, कर्मचारी साम, दाम, दंड,भेद असे सर्व पर्याय अवलंबून आपली सुटका करून घेण्यासाठी धडपड करत आहेत मात्र गुटख्यातून सुटका होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.