Corona-आज पासून पुन्हा कडक लॉकडाऊन, फक्त किराणा दुकाने सुरू राहणार

0 798

अहमदनगर –   राज्यात कोरोना विषाणूच्या  (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव बहुतेक जिल्ह्यात जवळपास कमी झाला आहे मात्र अहमदनगर जिल्ह्यात दिवसाला ५००- ८०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. याच बरोबर पुणेमधील  ससून हॉस्पिटलमध्ये नगर जिल्ह्यातील ४० टक्के रुग्णांची नोंद होत आहे.  हे आकडा पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांना  तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश दिले होते.

त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन (Lock Down) करून या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही खुली होणार नाहीत.

यामध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत. श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. कडक लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

कॉफी शॉपच्या नावाखाली चालू होता हा भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकली अन्…

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. अनेकदा आढावा बैठका घेतल्या, उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र फरक पडला नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी अलीकडेच नगरला भेट देऊन २० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत करोना समित्यांमार्फत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीही फरक पडला नाही.

Related Posts
1 of 1,603

अलीकडेच उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये नगर जिल्ह्यातील ४० टक्के रुग्ण असल्याची माहिती पुढे आली. त्यावर हे रुग्ण कोणत्या गावांतील आहेत, तेथील परिस्थिती का अटोक्यात येत नाही, याचा शोध घेऊन कडक उपाय करण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला होता.

 हे पण पहा –    गडकरी आणि पवार एकाच हेलिकॉप्टरने अहमदनगरमध्ये दाखल

 या गावात असणार लॉकडाउन 

लॉकडाऊन जाहिर केलेल्या गावांमध्ये लिंगदेव, वीरगाव, परखतपूर (अकोले), खांडवी, बाभूळगाव दुमाला (कर्जत), गोधेगाव (कोपरगाव), कुकाण (नेवासा), वडनेर बु., कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी (पारनेर), तिसगाव (पाथर्डी), भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, कोऱ्हाळे, लोणी.बु लोणी, खु., कोल्हार बु. (राहा ता), गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्ह वाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी (संगमनेर), भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बु., (शेवगाव), लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी (श्रीगोंदा), बेलापूर खुर्द, उक्कलगाव आणि कारेगाव (श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: