महिला, मुलींना त्रास दिल्यास कडक कारवाई – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0 11

जामखेड – समाजातील कोणत्याही महिला व मुलींना घरातील किंवा जवळच्या नात्यातील नातेवाईक, आपल्या गावात, बसस्थानक, रस्त्याने ये-जा करत असताना किंवा शाळा कॉलेजमध्ये कोणीही कसल्याही प्रकारचा त्रास देत असेल तर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन, ०२४२१-२२१०३३ किंवा माझा मो. नं ९४२२६४४०९० या नंबरवर मेसेज किंवा व्हॉटसअपला तक्रार करावी त्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल तसेच तक्रार करणाऱ्या मुली किंवा महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.

तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही ….. – देवेंद्र फडणवीस

जामखेड महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिनी मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी व  संवाद साधण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड बोलत होते. यावेळी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक फलके सर , तसेच  शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग तसेच ७० ते ८० विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, विद्यार्थीनींही शाळा काॅलेजमध्ये येताना बाहेरचे कोणी सोबत आणू नये. आपल्या तक्रारींवर कारवाई नक्की केली जाईल असेही पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य अशोक फाळके व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट – अजित पवार

Related Posts
1 of 1,301

जामखेड पोलीस स्टेशन येथेही महिला दक्षता कमिटी सदस्य, इतर प्रतिष्ठीत महिला पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अंमलदार यांची बैठक घेण्यात आली. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तसेस मिटींग दरम्यान उपस्थित सर्व महिला कमिटी सदस्य, प्रतिष्ठी महिला, पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदार यांना छोटीसी भेट व पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले.१० महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस स्टेशन येथील ३ महिला उपस्थित होत्या.

जाणून घ्या आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: