पशुधन विकास अधिकाऱ्याचा अजब फतवा .. मृत शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी पंचायत समिती मध्ये आना?

0 76
श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा गावच्या परिसरात मदने वाडी शिवारात एका बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढवला ते हल्ल्यामध्ये शेळी गंभीर जखमी झाली असून ती जागीच मरण पावली आहे.  याबाबत गावातील सजग नागरिकांनी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कटके यांच्याशी संपर्क साधला असता यांनी त्यांना सांगितले की मयत शेळीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे असेल तर ती मृत शेळी पंचायत समिती (Panchayat Samiti) मध्ये घेऊन या असा अजब फतवा डॉक्टर खटके यांनी काढल्यानंतर परिसरातील संजय सावंत दीपक गायकवाड, संजय गायकवाड, सरपंच चिंबळा यांनी मिळून एका चार चाकी मधून शेळी पंचायत समितीमध्ये आणल्यानंतर पशूसंवर्धन कार्यालयात ठेवण्यात आली.
त्यावेळी डॉक्टर प्रशांत कटके हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले असून त्यांनी सर्व आरोपांना दुजोरा दिला आहे मात्र त्यावेळी नागरिकांमधून डॉक्टर कटके यांच्या विषयी अनेक तक्रारी केल्या जात होत्या मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे पशुसंवर्धन विभागात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
Related Posts
1 of 1,603
डॉक्टर प्रशांत कटके यांना लोकसेवक असल्याचा विसर पडल्याची चर्चा?
श्रीगोंदा पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर प्रशांत कटके यांना आपण लोकसेवक असल्याचा विसर पडल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडून ऐकण्याचा मिळत होते त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना उलटसुलट उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यात पटाईत असल्याचे तसेच मी क्लास वन अधिकारी आहे ुम्ही इतर अधिकार्‍यांशी संपर्क साधा अशी उत्तरे देत असल्यामुळे प्रशांत कटके यांना लोक सेवक असल्याचा विसर पडल्याचे चित्र दिसत होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: