प्रतिनिधी – DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- काष्ठी लिंपणगाव रोडवरील एका हॉटेलच्या परिसरात पोलिसांनी गुटख्यावर अनमोल कारवाई केल्याने पोलिसांना वाटत होते की गुटख्याच्या कारवाईने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल मात्र या कारवाईने पोलिसावरच अनेक शिंतोडे उडाल्याने पोलिसांनी केलेल्या अनमोल कारवाई मध्ये हे मात्र अजब उदाहरण समोर आले आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी श्रीगोंदा रोडवर हॉटेल अन्यन्या हॉटेलच्या परिसरात पोलिसांनी गुटख्यावर छापा मारत गुन्हा दाखल करून एक बनावट आरोपी अटक केल्याची जोरदार चर्चा असताना त्यात अजून अनेक घटना समोर येताना दिसत आहेत महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदीचा कायदा अंमलात आणून राज्यभर गुटखा बंदी केली असल्याने गुटख्याला चांगला बाजार मिळू लागला. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानात गुटखा अगदी सहजपणे उपलब्ध होतो त्यास खादीचा नेहमीच गंध असतो मात्र यास सर्वस्वी पोलिसच जबाबदार आहेत.
हे आतापर्यंत लोकांनी पाहिलेले चित्र मात्र आता चित्र बदलले आहे. आता पोलिसच अनेक अवैध धंद्यात पार्टनर बनले आहेत त्यामुळे संपूर्ण तालुक्यात गुटखा अगदी सहज उपलब्ध होते आता काही ठिकाणी पोलिसच पार्टनर आहेत तर उरलेल्या धंद्यावाल्या कडून नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्याच्या पाठीमागे मुतारीजवळ दरमहा शेरणीचा प्रसाद स्वीकारला जातो असे अनेक प्रकार सर्व सामान्य लोकांनी पाहिले आहेत मात्र यातील रामायणातील रामाचा आशिर्वाद लव कुश यांना असल्यामुळे सर्व काही आलबेल सुरू आहे हे चित्र विदारक आहे हे बदलण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी केलेल्या अनमोल कारवाईत अजब उदाहरणे जनता पाहत आहे.
निम्म्याहून अधिक पोलीस खातात गुटखा
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अनेक पोलिसांच्या तोंडात कायम गुटखा मावा असतो ज्यांना कारवाई करायची आहे त्यांनाच गुटखा लागत असेल तर कारवाई करणार कोण ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे
तालुक्यातील अनेक व्यवसायिक भ्रमात
श्रीगोंदा तालुक्यातील अवैध गुटखा विक्री करणारी अनेक छोटे मोठे व्यवसायिक हे पोलिसांना चिरी मिरी देऊन खुश ठेवतात पण त्यांना काय माहीत ते विकतात तो माल पोलिसांचाच आहे त्यामुळे अनेक व्यवसायिक भ्रमात आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही
श्रीगोंदयात आणि कर्जत तालुक्यात पण गुटख्याचे जाळे ?
नोकरी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुटखा व्यवसाय श्रीगोदा आणि कर्जत तालुक्यात फोफावला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण केले आहे मात्र याबाबत कोणालाच कशी खबर नाही याबाबत नागरिकांतून अनेक उदाहरणे देऊन प्रश्न चिन्ह निर्माण करताना दिसत आहेत