महिलेने केला अजब दावा; म्हणाली ,एलियनमुळे झाली प्रेग्नेंट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 319
Strange claim made by woman; Said the alien made her pregnant; Learn the whole case

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

दिल्ली –  सोशल मीडियावर (Social Media) पुन्हा एकदा ‘एलियन्स’ (Aliens) चर्चेत आले आहे.  या एलियन्सबद्दल आता पर्यंत अनेकांनी भरपूर वाचला असले आणि ऐकलं देखील असं मात्र एका महिलेनं या एलियन्सबद्दल अजब दावा केल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चंना उधाण आला आहे. या महिलेने केलेल्या दाव्यानुसार एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर (Pregnant) राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

Related Posts
1 of 2,326

Anomalous Acute And Subacute Field Effects on Human and Biological Tissues‘ नावाच्या शीर्षकाच्या अहवालात यूएस संरक्षण मंत्रालयाने ‘अलौकिक अनुभव’ असल्याचा दावा करणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील काही प्रकरणं अतिशय साधी, काही अतिशय विचित्र तर एक केस ‘गूढ गर्भधारणा’ची होती. अहवालात एलियन किंवा यूएफओ जवळ आल्यावर दिसणाऱ्या प्रभावांची सूची समाविष्ट आहे.

यामध्ये दुखापतीपासून ते अपहरण आणि ‘सेक्स’ तसंच ‘मृत्यू’चीही पाच प्रकरणे आहेत. यादीत सहभागी इतर अनुभवांमध्ये वाईट स्वप्न, आवाज अचानक बंद होणं, डोळ्यांना दुखापत, श्वास घेण्यास त्रास आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) कडून मिळालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत द सनने हे निकाल प्रकाशित केले आहेत.

अहवालानुसार, यामध्ये सरकारद्वारे तयार करण्यात आलेले वैज्ञानिक अहवाल आणि UFO प्रोग्रामशी संबंधित पेंटागॉनच्या पत्रांचा समावेश आहे.अहवालानुसार, ‘बाहेरील विमानांशी संपर्क झाल्यामुळे’ अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ४२ प्रकरणे मेडिकल फाईलची आहेत आणि ३०० प्रकरणे ‘अप्रकाशित’ आहेत, ज्यात माणसं जखमी झाली आहेत. निकालाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्याची खिल्ली उडवली. ट्विटरवर एका युजरने लिहिलं की, ‘माझ्या मोठ्या पोटाचा अर्थ असा नाही की मी लठ्ठ आहे, तर मी रहस्यमयपणे गर्भवती आहे.’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: