
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम चालू आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कारणातून दोन गटात तुफान मारामारी झाली आहे.
Related Posts
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चा निवडणूक कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमानुसार अर्ज स्वीकृती करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज शेवटच्या दिवशी इथापे आणि वाळुंज गटात अर्ज भरण्याच्या कारणावरून श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या बाहेर तुफान मारामारी करण्यात आली मात्र या मारामारी मध्ये दोन्ही गटाचे लोक किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर घटनेबाबत तालुक्यासह टाकळी कडेवळीत गावात चर्चेला उधाण आले होते तसेच याबाबत विविध प्रकारच्या शंका कुशंका व्यक्त होताना दिसत होत्या मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (Storm fights between two groups over filing of candidature applications)