सैन्य भरती तात्काळ सुरू करावी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0 137

अहमदनगर –   दोन वर्षापासून बंद असलेले सैन्यभरती हे सैन्य भरती तातडीने सुरू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी ( Collector) यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार. विशाल साबळे, किरण पाटोळे, योगेश साठे, फिरोज पठाण, प्रसाद भिवसने‌ भाऊ साळवे, सागर ढगे. संजय जगताप, अनंता पवार, अभिषेक लडकत, संतोष भोसले आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षापासून सैन्यभरती बंद केले आहेत सैन्यात दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या हजारो तरुणांनी पोलिस सैन्य भरतीची तयारी केली आहे मात्र तयारी करणाऱ्या तरुण हवालदिल आहेत सैन्य भरती त्वरित सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक बनले असून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निवेदन देण्यात येत आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संसदेला घेराव घालण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
Related Posts
1 of 1,603
पाच वर्षे सैन्य भरतीचे वय मर्यादा वाढवण्यात यावी निमलष्करी दलात 1 लाख 27 हजार पदे रिक्त असताना केवळ पंचवीस हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढले आहे. ती जाहिरात पूर्ण 1 लाख 27 हजार पदांसाठी काढण्यात यावे वर्षाला किमान दोन भरती घ्याव्या अशा मागण्या वंचित बहुजन युवा आघाडी करीत आहे. तात्काळ सैन्यभरती केले नाही तर राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी मोर्चे काढले जातील. तरीही सैन्यभरती सुरू न झाल्यास वंचित ने या युवा पदाधिकारी आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन दिल्लीतील संसदेला गेरवा घालण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने दिला.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: