राष्ट्रवादी काँग्रेस कडून तहसीलदार यांना निवेदन

0 9
श्रीगोंदा :- श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात तातडीच्या सोईसुविधा उपलब्ध करून देऊन इतर काही मागण्या मान्य करण्याबाबत श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व शिवसेना युवासेनेच्या वतीने सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले आहे की श्रीगोंदा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या महामारीमुळे व अनेक प्रकारच्या रोगराईमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.
कित्तेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात सोई सुविधा अभावी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे आजार उदभवताना दिसत आहेत..आज रोजी शुक्रवार 11 मार्च मध्यरात्री १.३० च्या सुमारास नगरपालिका सफाई कामगार सुरज संजय ससाणे रा ससाणेनगर श्रीगोंदा यांचा तांत्रिक  सोईसुविधा नसल्यामुळे मृत्यु झाला आहे.जर  ग्रामीण रूग्णालयामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका असती तर त्या रुग्णाला जीव गमवावा लागला नसता.तरी ग्रामीण रूग्णालयामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका, आय.सी.यु. लहान मुलांच्या सर्व सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध करून देण्यात यावेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शरद पवार यांनी केला स्वागत … 

Related Posts
1 of 1,290
तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे डॉक्टरांनीही रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णासाठी सेवा देण्यात यावी अशी सूचना आपले स्तरावरून देण्यात यावी असे म्हंटले आहे.तरी या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप व शिवसेना युवासेना तालुका अधिकारी हरिभाऊ काळे यांनी म्हंटले आहे .

 

तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार – उद्धव ठाकरे

तरी निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे कार्याध्यक्ष गोरख घोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, युवा नेते शाम भाऊ जरे, काँग्रेस चे पदाधिकारी आदेश शेंडगे, युवासेना शहर प्रमुख ओंकार शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आकाश भोसले, सा न्या विभागाचे शहर कार्याध्यक्ष जितू पाटोळे,अमित ससाणे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मला वनमंत्री पद द्या शिवसेनेच्या या नेत्याने केली उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: