जाहीर सभेत जातीचा एकेरी उल्लेख करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी निवेदन

0 179

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी जाहीर सभेत जातीचा एकेरी उल्लेख करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी तालुक्यातील विविध संघटना कडून आज दिवसभर निषेध नोंदविण्यात आला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक याना देण्यात आले आहे.

 

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमाची प्रचार सांगता सभेत ग्रामपंचायत सदस्य यांच्या मुलाने मागासवर्गीय जातीचा एकेरी उल्लेख केल्याने समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे .

सदर वक्तव्य हे सांगता सभेत बोलताना ग्रामपंचायत सदस्य याचा मुलगा शिवहरी वाळूज हा बोलताना म्हणाला की , समोरील पॅनलचे प्रमुख वकील यांनी मतदानासाठी भावकी एकत्र केली . मग आम्ही काय महार , मांग का पारधी होतो ? असा मागासवर्गीय जातीचा एकेरी उल्लेख वाळूज यांनी केला . सदरील जातीचा उल्लेख हा भारतीय संविधानाच्या कलम १७ चे उल्लंघन करणारे वक्तव्य असून सदरील वक्तव्याचा ऑल इंडिया पँथर सेना श्रीगोंदा तालुका , अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे .

 

 

Related Posts
1 of 2,222

सदरील इसमावर प्रशासनामार्फत समज देवून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पंधर सेना यांच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे या निवेदनात .

 

शिंदे अविनाश पोडके भूषण धाडमे, अमर घोडके, योगेश गंगावणे यांनी तहसिलदार , पोलीस निरीक्षक श्रीगोंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: