“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”

0 339

नवी मुंबई –  दिल्ली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक आहे. हे दहशतवादी (Terrorists) दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करणार होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे.

दिल्ली पोलीस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?? अशी टीका चित्रा वाघ यांनी ट्विट करुन महविकास आघाडी सरकारवर केली होती. आता या टीकेला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिला आहे.

 

Related Posts
1 of 1,640

 

ट्विट करत त्यांनी चित्र ताईंना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, दहशतवादी दिल्लीत पकडले असताना ही महाराष्ट्रात पकडल्याचं सांगत आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या टॉपर आहेत ताई, आता बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल, अशी टीका केली चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: