बंद पडलेले ट्राफिक सिग्नल सुरू करून द्या, अन्यथा आंदोलन करू काँग्रेसचा आयुक्तांना इशारा

0 11
अहमदनगर – शहरातील बऱ्याच सिग्नल बंद अवस्थेत दिसत आहेत, तेथे पोलिस देखील कधीच दिसत नाही यासंदर्भात युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे , वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या भेटीनंतर आता मनपा आयुक्त शंकर गोरे यांना युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसने निवेदन दिले आहे.
शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे व त्याने अनेक अपघात देखील होत आहेत,व नागरिकांना वाहतुकीच्या बाबत कुठली शिस्त दिसत नाही याचे कारण बंद पडलेले ट्राफिक सिग्नल व तेथे उपस्थित नसलेले पोलीस कर्मचारी महानगरपालिकेने त्वरित वाहतूक शाखेला ट्रॅफिक सिग्नल दुरुस्त करून ते सुरुळीत सुरू करून द्यावेत अन्यथा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
Related Posts
1 of 1,290
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रिजवान अहमद, डॉ. बागल, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, शुभम शिर्के, शंकर जगताप, आकाश साळवे, आशिष गुंदेचा प्रकाश सामलेती, विशाल कळमकर आदी उपस्थित होते.

 

मागच्या २४ तासांत २३५ रूग्णांना डिस्चार्ज तर ५५९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: