तारकपूर आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ..

0 227

 अहमदनगर  – तारकपूर आगार (Tarakpur Depot) येथे राज्य परिवहन कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांचे (ST employees) काम बंद आंदोलन करण्यात आले व एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन निर्णयाप्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. (ST workers strike at Tarakpur depot ..)

 यावेळी एसटी कर्मचारी समवेत आंदोलनासाठी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी पाठिंबा दर्शवित म्हणाले की राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असून हे अन्यायकारक आहे व कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारने मागण्या मान्य कराव्यात व लाल परी च्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी  करण्यात आली यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, मनसेचे नितीन भुतारे, भाजपाचे भय्या गंधे, अभिषेक दायमा, गणेश ननवरे, तुषार पोटे, एसटी कर्मचारी अशोक टकले, प्रवीण दळवी, विनोद गोरे, उषा उदावंत, सोनाली शिंदे आदी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
1 of 1,608
दिलेल्या पगारामुळे मूलभूत गरजा भागविणे कठीण आहे त्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झालेला आहे या नैराश्यातून कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे आणि तो आत्महत्येचा आकडा 36 पर्यंत झालेला आहे व तो वाढत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन हे राज्य शासनात विलीनीकरण करून सर्व सवलती राज्य शासना प्रमाणे  देण्यात यावे याकरिता तारापूर आगारातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेले आहे. (ST workers strike at Tarakpur depot ..)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: