हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

0 318

सातारा – जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा (Medha ST Depot employee) ह्दयविकाराच्या (heart attack)  झटक्याने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय-34) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नांव आहे. तटपुंजा पगार आणि संपामुळे संतोष तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.( ST workers die of heart attack)

मिळालेली माहिती अशी सातारा तालुक्यातील आसगाव येथील संतोष शिंदे तीन वर्षापासून मेढा एसटी डेपोमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. अशातच लॉकडाऊन लागले त्यानंतर आता संप सुरू झाला. यामुळे तटपुंज्या पगारात जगायचे कसे या विचाराने संतोष हताश झाले होते. अशातच गेल्या आठ दिवसापासून ते तणावाखाली होते.

समीर वानखडे यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, कारण गुलदस्त्यात

Related Posts
1 of 1,481

काल मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ( ST workers die of heart attack)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: