एसटी कर्मचारी आक्रमक: ‘सिल्व्हर ओक’ वर धडक; पवारांविरोधात घोषणाबाजी

0 186
Silver oak case; Big mistake made by the police? ; Shocking revelation in FIR
प्रतिनिधी- DNA मराठी टीम 
मुंबई : मागच्या पाच महिन्यापासून एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे . मात्र राज्य सरकारने एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीला अमान्य केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’वर धडक दिली आहे.  यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. (ST workers attack: Hit on ‘Silver Oak’; sloganeering against Pawar)
Related Posts
1 of 2,452
आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’ समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाला. दरम्यान, भाजपचे विविध नेते आणि वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या चिथावणीमुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. (ST workers attack: Hit on ‘Silver Oak’; sloganeering against Pawar)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: