एसटी संप चिघळला…, एसटीला दररोज 15 कोटींचे नुकसान

0 262
 नवी मुंबई –  मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी (ST) महामंडळाचा संप आता चिघळत चालला आहे. राज्यात सोमवारी जवळपास  250 पैकी 228 आगारांतील कामकाज ठप्प होते. यामुळे दिवाळी नंतर परत एकदा आपल्या आपल्या कामासाठी बाहेरगावामध्ये जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या प्रचंड हाल आहे. (ST strike simmered …, daily loss of 15 crores to ST_
 एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला कोणतेही नेतृत्व राहिले नसल्याने कर्मचारी स्वतःहून आता या आंदोलनात सहभागी होत असल्याचा दिसून येत आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी समिती नेमण्याच्या निर्णयावरही असमाधान व्यक्त करीत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Related Posts
1 of 1,608

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी बुधवार 27 ऑक्टोबरच्या रात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. संघर्ष एसटी कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी संप पुकारण्याची नोटीस दिली होती. तेव्हापासून दररोज राज्यातील विविध आगारांमध्ये कामकाज बंद ठेवून संप पुकारण्यात येत आहे. राज्यात एसटी महामंडळाचे एकूण 250 आगार आहेत. यापैकी राज्यातील विविध भागांतील 59 आगार शुक्रवारी बंद होते. शनिवारी 65 आगारांत संप सुरू होता. रविवारी ही संख्या 129 आगारांपर्यंत गेली तर सोमवारी 228 आगारांतील कामकाज बंद होते. गेले 12 दिवस मुंबईत संपाची झळ बसली नव्हती; परंतु रविवारी सकाळी परळ आणि ठाण्यातील काही आगारांत तर सोमवारी पनवेल, ठाणे आणि मुंबई सेंट्रल आगारांतही बंद पाळण्यात आला.(ST strike simmered …, daily loss of 15 crores to ST)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

रोजचे 15 कोटींचे नुकसान

कोरोनापूर्व काळात एसटी महामंडळाला दररोज 22 कोटी उत्पन्न मिळत होते. सध्या एसटी महामंडळाला दररोज 13 कोटी उत्पन्न कसेबसे मिळत आहे. एसटी महामंडळात 97 हजार कर्मचारी असून त्यांच्या वेतनासाठी महिन्याला 270 कोटी रुपयांची आवश्यकता असते. सोमवारी एसटी महामंडळाच्या गाडय़ा बाहेर न निघाल्याने जवळपास 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची समोर आली आहे .

फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: