
श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची युती होऊन, श्रीरामपूर सहकार विकास पॅनल माध्यमातून, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी समविचारी पक्षांनी एकत्र येत शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून एकास एक उमेदवार दिलेले आहे.
Ahmednagaar bank – बँकेचा शेतकर्यांना दिलासा… खेळत्या भांडवलात वाढ….
श्रीरामपूर बाजार समितीत दुरंगी लढत रंगणार असली, तरी अनेकांची माघार न झाल्याने डोकेदुखी वाढली आहे. त्याचा परिणाम कोणत्या पँनलवर होईल हे सांगता येत नाही. अपक्ष मात्र यावेळी नेत्यांना अडचणीत आणणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुरंगी लढतीत कोण विजयी होणार यावर चर्चा सुरु झाली आहे.