श्रीगोंदा पोलिसांनी एका सराईत अट्टल मोबाईल चोराला केले गजाआड

0 13
 श्रीगोंदा :-  श्रीगोंदा पोलिसांनी एका सराईत अट्टल मोबाईल चोराला जेरबंद करून त्याच्याकडून १,५०,००० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे १९ मोबाईल हस्तगत केले.खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाच्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेत वांगी शिवार,ता.करमाळा, जि.सोलापूर येथे जाऊन मोठया शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले व विचारपूस केली असता चोरट्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली .
महेश मंगेश काळे वय २४वर्षे,रा.कुळधरण,ता.कर्जत असे या सराईत मोबाईल अट्टल चोराचे नाव आहे.त्याच्या विरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय सुरेश आळेकर यांचे वडील घराच्या टेरेसवर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने २४/०१/२०२१ रोजी रात्री विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला.तसेच त्यांचे शेजारी राहणारे दिपक अनिल गणिशे यांचा देखील सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेश काळेवर या आधी देखील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

 

१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार करणाऱ्या आठ जणांना अटक 

अटक आरोपीस प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी साहेब श्रीगोंदा यांचेसमोर हजर केले असता त्यास कोर्टाने चार दिवसांची पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.सदरची कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि दिलीप तेजनकर,पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,प्रकाश मांडगे, दादा टाके,किरण बोऱ्हाडे, संजय काळे,गोकुळ इंगवले तसेच सायबर सेलचे पो.कॉ.प्रशांत राठोड,नितीन शिंदे यांनी केली.तसेच पुढील तपास पो.ना.भारत खारतोडे व पो.कॉ.नामदेव सगर हे करीत आहेत .
Related Posts
1 of 1,301
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: