Ahmednagar news श्रीरामनवमी उत्सवानिमित काढण्यात येणार्या शोभायात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच
श्रीरामनवमी उत्सवानिमित्त -अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे

अहमदनगर : श्रीरामनवमी (Shri Ramanamami) उत्सवानिमित्त शहरात उद्या शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिरवणूक मार्गावर २५ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तसेच १५ जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून, ९५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
गौतमी पाटीलची लावणी , तरुणांनी गोंधळ उडाला, पोलिसांनी लाठीचार्ज.
मिरवणूक मार्गावर गर्दीमुळे पंचपीर चावडी ते चाँद सुलताना हायस्कूल या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलिसांनी परिसरातील नागरिकांना दिल्या आहेत. मिरवणुकीवेळी वाहने रस्त्यावर उभी केल्यास पोलिसांकडून ती जप्त केली जातील, असे यादव यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे. पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हिंदू राष्ट्र सेना व सकल हिंदू समाजाच्या वतीने मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मिरवणूक मार्गावर तब्बल ५५ पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी वीजप्रवाह खंडित झाल्यास मिरवणूक मार्गात विजेची व्यवस्थादेखील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच रामनमवी उत्साहात साजरी व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे.
ahmednagar crime :- अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 05 आरोपी विरुध्द कारवाई
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि शहरातील संघटनांचे ट्रस्टी यांच्यासोबत बैठक झाली.