नाद एकच बैलगाडा शर्यत ; १६ तारखेला पिंपळगाव पिसा या ठिकाणी शर्यतीचे आयोजन

0 236
Sound single bullock cart race; Race at Pimpalgaon Pisa on 16th

 

श्रीगोंदा –  शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन जात आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यामध्ये देवदैठण या ठिकाणी नुकतीच भव्यदिव्य बैलगाडा शर्यत पार पडली.

तर आत्ता श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे प्रथमच रेणुकामाता यात्रा उत्सव निमित्त व कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत होणार आसुन तसेच बैलगाडी शर्यतीचे आयोजन कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँक चे संचालक व माजी आमदार राहुलदादा कुंडलिकराव जगताप पाटील मित्रपरिवार व श्री रेणुकामाता देवी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ पिंपळगाव पिसा यांनी आयोजन केले असून प्रथम बक्षीस २,२२,२२२ रूपये, द्वितीय बक्षीस १,६६,६६६ रुपये तृतीय बक्षीस १,२५,५५५ रुपये तसेच चतुर्थ बक्षीस ९९,९९९ राहनार आहे, फायनल सम्राट साठी २५,००० रु ,२०,००० रु , १५००० रु, ११००० रुपयेची हि चार बक्षिसे राहणार आहेत. मनपसंद बैलगाडा साठी ११,००० रुपये बक्षीस राहणार आहे. वीस फुटांवर कांडे लावून प्रथम येणाऱ्या गाड्यास ११,१११ रुपये बक्षीस राहणार आहे. घाटाचा राजा म्हणून २५,००० रुपये बक्षीस राहणार आहे. तसेच शर्यतीमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व गाडा मालकास फेटा बांधून चषक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ही बैलगाडा शर्यत शासनाची परवानगी सह माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सर्व नियम चे अटींचे पालन करून होणार आहे.

 

 बैलगाडा शर्यतीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार,आमदार संग्रामभैया जगताप,आमदार अशोक बापू पवार,आमदार निलेश लंके यांसह अनेक मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमवार दिनांक १६/०५/२०२३ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सावित्रीबाई महाविद्यालय समोर पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे तर या शर्यती मध्ये भाग व टोकण घेण्यासाठी प्रमोद जगताप , सूर्यजित पवार , सुभाष पंदरकर , शिवाजी शिंदे  व सचिन भोसले  यांचेशी संपर्क साधावा अशी माहिती बैलगाडा शर्यत आयोजकांनी दिली आहे.
Related Posts
1 of 2,326
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: