लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरू, शासनाकडून हालचाली सुरू

0 242

नवी मुंबई –  देशासह राज्यात कोरोनाबधित रूग्णसंख्या (Corona Patients) वाढल्याने मागच्या दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा (School) परत एकदा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच राज्यात ८वी ते १२वी पर्यंतच्या वर्ग सुरू झाले आहे.(Soon the first to fourth schools will be started, the government will start the movement)

तर आता दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

सध्या राज्यात ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन पाहिली ते सातवी पर्यंत शिक्षण सुरू आहे. तर दुसरीकडे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. याबाबत पालकांकडून विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधत पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

Related Posts
1 of 1,463

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याच्या द़ृष्टीने नियोजन केले जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरून त्यासंबंधीचा अंतिम निर्णय होईल. अशी माहिती दिनकर टेमकर (संचालक,प्राथमिक शिक्षण पुणे) यांनी दिली आहे.(Soon the first to fourth schools will be started, the government will start the movement)

दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आपल्या आईचा खून , आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: