ठाकरे- पवार यांच्या उपस्थित सोनिया गांधी घेणार 18 विरोधी पक्षांची बैठक

0 954

नवी दिल्ली –   देशात सुरू असलेल्या अनेक राजकीय मुद्यावरून तसेच येणाऱ्या आगामी २०२४ च्या लोकसभा (Lok Sabha of 2024) निवडणुक समोर ठेवून आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज देशातील तब्बल १८ विरोधी  पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. बैठकीमध्ये  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हि बैठक ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे.  (Sonia Gandhi will hold a meeting of 18 opposition parties in the presence of Pawar and Thackeray)

नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी प्रकरण (Pegasus espionage case), शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलं. आज सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सोनिया गांधी यांनी डिजिटल बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष या बैठकीत उपस्थित राहणार नाहीये. तसेच शिरोमणी अकाली दलालाही आमंत्रित केले नसल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वादग्रस्त तीन कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने गेल्यावर्षी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. मात्र, त्यांनी विरोधी पक्षांसोबत जाण्याच्याऐवजी आपले लक्ष कृषी कायद्यांवर केंद्रीत केले आणि त्यासाठी आपला वेगळा मार्ग अवलंब करत असल्याचं दिसत आहे.(Sonia Gandhi will hold a meeting of 18 opposition parties in the presence of Pawar and Thackeray)

खासदार विरोधात गुन्हा दाखल, हुंड्यासाठी छळवणूक केल्याचा आरोप

Related Posts
1 of 1,512
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: