सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? ‘त्या’ फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण

मुंबई – बॉलीवूडची (Bollywood) चर्चित अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) नेहमी तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर (Social Media) काहींना काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटो आणि व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि कमेंट देत असतात. त्यामुळे नेहमी सोशल मीडियावर सोनाक्षी चर्चेत राहते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. यामुळे सोनाक्षी बद्दल बी- टाउनमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सोनाक्षीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. यश फोटोला पाहून सोनाक्षीचा साखरपुडा झाल्याची चर्चा बी – टाऊन मध्ये सुरु झाली आहे. या फोटोंमध्ये ती एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे पण तिने तिचा पार्टनर कोण आहे हे सांगितलेले नाही.
फोटोंमध्ये, सोनाक्षी तिच्या होणाऱ्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले की, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण माझे एक स्वप्न पूर्ण होणार आहे.या फोटोमध्ये सोनाक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. ‘नोटबुक’ चित्रपटाचा अभिनेता झहीर इक्बालसोबत सोनाक्षीने साखरपुडा केल्याची चर्चा आहे.
या फोटोमध्ये सोनाक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. ‘नोटबुक’ चित्रपटाचा अभिनेता झहीर इक्बालसोबत सोनाक्षीने साखरपुडा केल्याची चर्चा आहे. सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.