सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा… अनिल परब यांनी दिला सोमय्यांना इशारा ..

0 793

नवी मुंबई –   माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) , परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hassan Mushrif) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. या आरोपावरून आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना 72 तासांत माफी मागा मागवी अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले आहे. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

तसंच, नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शन देखिल या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचा दावाच सोमय्या यांनी केला होता.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा चित्रपट झाला रद्द

Related Posts
1 of 1,635

या गंभीर स्वरूपाचे आरोपाला आता परब यांनी कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी केली आहे. सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे.त्या आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 72 तासात माफी मागावी नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीसच अनिल परब यांच्या वकिलांनी सोमय्या यांना पाठवली आहे.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: