तर अभिनेत्री क्रिती सेनन लिव्ह इनमध्ये राहून सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म ?

0 312

नवी मुंबई –  बॉलिवूडमध्ये (Bollywood) चर्चित अभिनेत्रींपैकी (Actress) एक असलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन (Kriti Senan) होय. तिने आपल्या अभिनयामुळे बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर (Social Media) देखील सक्रिय असते. आपल्या फॅन्स (Fans) बरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. क्रितीने नुकताचं एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात , सहभाग घेतला होता. ज्यामध्ये तिने लिव्ह-इन रिलेशनशिप आणि सरोगसीवर मोकळेपणाने मत मांडलं आहे.(So will actress Kriti Senan stay in a live-in and give birth to a baby by surrogacy?)

Related Posts
1 of 96

यावेळी क्रितीला सेननला विचारण्यात आलं, क्रिती सेनन कधी समाजाच्या कचाट्यातून बाहेर पडून लिव्ह-इन रिलेशनशिप (Live-in relationship) आणि सेरेगोसी (Seregosi) चा निर्णय घेऊ शकते का? यावर प्रतिक्रिया देताना क्रितीने स्वतःचं मत मांडलं आहे.

क्रिती म्हणते यामध्ये काहीही चुकीचे नाही माझे आई-वडील मला परवानगी देतील असं मला वाटत नाही. पण माझी आई खूप मस्त आहे. आई माझ्या या निर्णयाचं स्वगत करेल. पण नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा ती मला याची काय गरज आहे? हे नक्कीच विचारू शकते. मीमी’ सिनेमाचं उदाहरण देत, सरोगसीबद्दल बोलताना ती म्हणाली, सरोगसीमध्ये काहीही चुकीचे नाही, सिनेमा सरोगसी कायद्यापूर्वी बनवलेला आहे. अशा घटनांनंतरच सरोगसी कायद्याची गरज निर्माण झाली. क्रितीने ‘मीमी’ सिनेमाच्या माध्यमातून अनेकांची मने जिंकली होती.

क्रिती पुढे म्हणाली, जर तुम्हाला काही काळानंतर मूल होऊ शकत नसेल आणि तुमच्या कुटुंबात, जीवनात आनंद हवा असेल तर सरोगसीचा निर्णय घेण्यात गैर काहीच नाही असं देखील क्रिती म्हणाली. (So will actress Kriti Senan stay in a live-in and give birth to a baby by surrogacy?)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: