तर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….

0 404

नवी मुंबई –   पुढच्या महिन्यापासून  टी- २० वर्ल्डकप सूरू होत आहे.  जर या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ विजेता झाला नाहीतर भारतीय संघाचा मर्यादित षटकांचे कर्णधारपद बदलू जाऊ शकते. अशी माहिती समोर आली आहे.विराट कोहलीचे मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे माञ भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे.

एका अहवालानुसार, टीम इंडियाचा कर्णधार विराट आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. कर्णधारपदावरून याआधीही तो अनेकवेळा चर्चेत आला आहे. विशेषत: एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आल्यानंतर विराट आपले कर्णधारपद गमवू शकतो. बीसीसीआय कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल खूप चिंतित आहे,  आयसीसी स्पर्धांमध्ये तो कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. डब्ल्यूटीसी फायनलनंतर जुलैमध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे दिसून आले, की बीसीसीआयचे अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर समाधानी नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मोठा निर्णय

Related Posts
1 of 65

या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ उपस्थित होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन फिरकीपटूंसोबत पुढे जाण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी फारसा आवडला नाही आणि म्हणूनच टी-२० वर्ल्डकप कोहलीची शेवटची संधी असू शकते.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: