…तर मला विजय चौकात फाशी द्या; ‘त्या’ प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांची मोदी सरकारवर टीका 

0 260
Supriya Sule lashed out at Navneet Rana's role and said, "Shall I tell you the truth?" ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई –  लोकसभेमध्ये (Lok Sabha) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद करत या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं? असा सवाल सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित केला.
Related Posts
1 of 2,208

सुप्रिया सुळे म्हणाल्या कि तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?  हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

तर मला विजय चौकात फाशी द्या

आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा,असं संतप्त मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: