इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी करून घेतला सर्पदंश , अकोले तालुक्यातील अजब कहाणी

0 203

अहमदनगर –  22 एप्रिल 2021 ला सर्प दंश झाल्याने प्रभाकर वाकचौरे ही चोपन्न वर्षीय व्यक्ती मृत झाली. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती .या इसमाच्या मृत्यू संदर्भात इन्शुरन्स डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार अधिक तपासाची चक्रे फिरवण्यात आली . त्यानुसार ही व्यक्ती गुजरात येथील बडोदामध्ये आढळून आली आणि या गुन्ह्याचा अर्धा उलगडा झाला. (Snake bite to get insurance money, a strange story in Akole taluka)

इन्शुरन्स डिपार्टमेंट ने दिलेल्या या धक्कादायक माहितीच्या आधारे अधिक तपास करण्यास पोलीस प्रशासनास भाग पाडले होते पॉलिसी क्लेम करण्यासाठी दुसऱ्यांदा त्याने हा बनाव रचला होता .मात्र यावेळी एका मनोरुग्ण इसमाचा मृत्यू ओढवला होता .

बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, गून्हा दाखल

Related Posts
1 of 1,603

स्वतःला मृत दाखवण्यासाठी मुख्य आरोपी प्रभाकर वाकचौरे आणि त्याच्या साथीदारांनी सर्पदंश करून नवनाथ आनप या मनोरुग्ण इसमाचा बळी दिला होता .या प्रकरणी पॉलिसीचा क्लेम मिळवण्याकरता सर्प दंश करून मनोरुग्ण व्यक्तीचा खून करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध राजूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Snake bite to get insurance money, a strange story in Akole taluka)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: