स्मृती इराणींना कपिल शर्माच्या सेटवर नो एंट्री ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 224

नवी मुंबई –   ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) लोकप्रिय टीव्ही शो  द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) च्या सेटवर पोहोचल्या होत्या मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना सेटवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने ओळखलेच नाही आणि त्यांना सेटवर जाण्यापासून रोखले. त्यामुळे स्मृती इराणी शूटिंग न करताच माघारी परतल्या .(Smriti Irani gets no entry on Kapil Sharma’s set! Learn the whole case)

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांचा ड्रायव्हरसह आणखी दोन लोकांच्या सोबत सायंकाळीच्या वेळात कपिल शर्मा शोच्या सेटवर पोचल्या होत्या मात्र गेटवर उभा असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना ओळखलेच नाही. त्याने इराणी यांना आत जाऊ दिले नाही. स्मृती इराणी यांनी त्या सुरक्षा रक्षकाची समजूत काढत    आम्हाला एपिसोड शूट करण्यासाठी खास आमंत्रण आहे, मी केंद्रीय मंत्रीदेखील आहे. असे म्हणाले मात्र सुरक्षा रक्षक काहीच एकला नाही. 

तुमची लायकी काय आहे? संजय राऊत यांचा पडळकर-खोत यांच्यावर हल्लाबोल

तेवढय़ात तिथे आलेल्या एका फूड डिलिव्हरी बॉयला मात्र काहीही न विचारता सुरक्षा रक्षकाने आत सोडले. त्यामुळे इराणी यांच्या रागाचा पारा आणखी चढला. अखेर शूटिंग न करताच त्या दिल्लीला परतल्या.

कपिल शर्माची माफी

दरम्यान, आपण ज्यांना आत जाण्यापासून रोखले त्या केंद्रीय मंत्री आहेत असे समजताच त्या सुरक्षा रक्षकाने तेथून पळ काढला आणि मोबाईलदेखील बंद केला. कपिलच्या टीमला हा प्रकार समजल्यावर सेटवर एकच गोंधळ उडाला. शोच्या टीमने स्मृती इराणी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर कपिलनेदेखील इराणी यांची माफी मागितली आहे. मात्र, आता त्या पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार की नाही अद्याप अस्पष्ट आहे. (Smriti Irani gets no entry on Kapil Sharma’s set! Learn the whole case)

Related Posts
1 of 1,512
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: