सिल्व्हर ओक प्रकरण; पोलिसांकडून झाली मोठी चूक? ; FIR मध्ये धक्कादायक खुलासा

0 558
Silver oak case; Big mistake made by the police? ; Shocking revelation in FIR

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

Related Posts
1 of 2,139

मुंबई –  मागच्या पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळाला. काही कथित एसटी कर्मचाऱ्यांनी  (ST Employees) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी राडा घातला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाला एकच  वेगळाच वळण मिळाला आहे.

एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी जाणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण तरी सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवला नव्हता, असं पोलिसांच्या एफआयआरमध्ये उघड झालं आहे. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी  शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी धुडगूस घातला होता.

या FIR मध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. ८ तारखेला दुपारी ३ वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण ७ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही.

७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी दिले होते चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. या प्रतिक्रियेला प्रेरीत होवून आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच पोलिसांना माहिती मिळाली होती. आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरी देखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: