श्रीगोंद्यात 26 जानेवारीला रंगणार सिकंदर शेख विरुद्ध कमलजित सिंग कुस्ती …!!

0 29

 

*प्रतिनिधी सर्जेराव साळवे*
श्रीगोंदा शहरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकनेते राजेंद्र म्हस्के व पै.आप्पासाहेब सोनवणे मित्र मंडळाने भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजन केले असून 26 जानेवारी रोजी श्रीगोंदा बाजारतळ येथे हे कुस्ती मैदान होणार आहे.अशी माहिती राजेंद्र म्हस्के व आप्पासाहेब सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा पैलवानांचा तालुका आहे. अलीकडे कुस्त्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. परंतु तालुक्यातील तरुणांना व पैलवानांना प्रेरणा मिळावी व कुस्ती या कलेला वाव मिळावा म्हणून आपण या स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे.

आप्पासाहेब सोनवणे म्हणाले की,मला कुस्तीची आवड आहे खूप दिवसांपासून मैदान घेण्याची इच्छा होती.राजेंद्र म्हस्के यांच्यासारखा सहकारी मिळाल्याने माझी इच्छा पूर्ण झाली.श्रीगोंदा शहरात प्रथमच भूतो ना भविष्य असे कुस्ती मैदान होणार आहे.

 

Related Posts
1 of 2,427

या भव्य निकाली कुस्ती मैदानात जवळपास 70 कुस्त्या होणार आहेत.त्यामध्ये पै.सिकंदर शेख विरूद्ध पै.कमलजित सिंग यांच्यामध्ये एक नबंरची
कुस्ती . दोन नंबरची तीन लाख रूपयांची कुस्ती पै.माऊली जमदाडे विरूद्ध पै.रविराज यांच्यामध्ये होणार आहे. तीन नंबरची दीड लाख रुपयांची कुस्ती पै सुरेश पालवे विरुद्ध शकील शेख यांच्यामध्ये होणार आहे.

 

सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणारा सिकंदर शेख विरुध्द कमलजीत सिंग याची एक नंबरची कुस्ती होणार असून या कुस्तीसाठी 5 लाखाचे बक्षीस असल्याने सिकंदर शेखची कुस्ती पाहण्याची उत्सुकता श्रीगोंदेकरांसह कुस्ती प्रेमींना लागली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: