Sidharth Shukla Death, जाणून घ्या काय घडलं त्या रात्री?

0 340

 नवी मुंबई –  बिग बॉस (Big Boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Siddharth Shukla) याचा दि. २ सप्टेंबर गुरुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाला. गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती  रुग्णालयाकडून  देण्यात आली.  सिद्धार्थ शुक्ला याचा निधन वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांसह सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडे आठ वाजता तो घरी पोहचला. त्यानंतर तो बिल्डिंगमधील कंपाउंडमध्ये जॉगिंगसाठी गेला. जवळपास रात्री साडेदहा वाजता तो घरी परतला. त्यानंतर त्याने जेवण केलं.  सूत्रांच्या माहितूनुसार जेवण करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो झोपी गेला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला जाग आली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखत असल्याचे त्याने आईला सांगितले. त्याच्या आईने त्याला प्यायला पाणी दिले आणि झोपण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर सिद्धार्थ सकाळी उठलाच नाही.  आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आईने सिद्धार्थच्या बहिणीला फोन केला, आणि बहिणीने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली. सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला कूपर रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याची बहीण, मेहुणा, चुलत भाऊ आणि तीन मित्र उपस्थित होते. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे, मात्र सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते, असे स्पष्ट करत शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकेल, असे कूपर रुग्णालयाकडून सांगण्यात आले. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
१९८० साली मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिके पासून छोट्या पडद्यावर त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर ‘जाने पेहचाने से ये अजनबी’, ‘आहट’ आणि ‘सीआयडी’ मालिकेचे काही भाग तसेच ‘लव्ह यू जिंदगी’सारख्या मालिकांमधून त्याने काम केले. २०१२ साली कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. ‘इंडियाज गॉट टॅलेन्ट’च्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालन, ‘फीअर फॅ क्टर : खतरों के खिलाडी’ या शोचे विजेतेपद यामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली. ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाने या लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्याची ‘ब्रोकन बट ब्युटीफु ल’ ही पहिलीच वेबमालिकाही नुकतीच प्रदर्शित झाली होती. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही त्याने खास पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.
Related Posts
1 of 67
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: