श्रीगोंद्याचे काळे होणार.. प्रथमवर्ग न्यायाधीश..!

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीधर काळे हे मुळचे श्रीगोंद्याचे.. उदरनिर्वाहासाठी त्यांनी श्रीगोंदा सोडला आणि पुण्यातील गुलटेकडी येथे चहाची टपरी टाकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी सायकल दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. रवी हा त्यांचा मुलगा.रवी काळे यांचे प्राथमिक शिक्षण संत नामदेव माध्यमिक विद्यालय महर्षी नगर, पुणे येथे झाले. Sp कॉलेज मधून पदवी घेतल्यानंतर एमपीएससी चा अभ्यास सुरू केला. मात्र, 3 गुण कमी पडल्याने त्यांना पीएसआय पदाला मुकावे लागले. परिस्थितीशी दोन हात करत, रवी काळे यांनी वायसीएम मधून लॉचे शिक्षण पूर्ण केले.
2017 मध्ये लग्न झाल्यानंतर रवी काळे यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश पदाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यात प्रताप परदेशी, श्रीनिवास मोरे, गणेश शिरसाट, संतोष चव्हाण इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.. वडील श्रीधर काळे यांनी त्यांना सदैव पाठिंबा दिला.
रवी काळे यांनी सन 2019 मध्ये पूर्व परीक्षा, 2021 मध्ये मुख्य परीक्षा तर 2022 मध्ये मुलाखत दिली. दिनांक 24 मार्च 2022 रोजी या परीक्षेचा निकाल लागला. त्यात त्यांना 250 पेक्षा 144 गुण मिळाले व त्यांची प्रथम वर्ग न्यायाधीश पदी निवड झाली.निवडीनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक वर्षाव होताना दिसत होता.