DNA मराठी

राष्ट्रवादीच्या ‘या’ सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाचा बहुमान श्रीगोंदा तालुक्याला

0 301
Shrigonda taluka honored with the post of State President of NCP's 'this' Cell
श्रीगोंदा –  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या माजी सैनिक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील दीपक गणपतराव शिर्के यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली, यावेळी दिपक गणपतराव शिर्के एकमताने निवड करण्यात आली सदर नियुक्ती पत्र शरद पवार हस्ते देण्यात आली.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार सुप्रिया ताई सुळे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,कर्नल संभाजी पाटील,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मा. श्री. शिवाजीराव गर्जे,आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख,पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोद हिंदुराव, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक सचिव मंगेश मोरे, OBC सेल चे श्री. अर्जुन गरुड, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी सैनिक यांच्यासह प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल स्थापन झाल्याने पक्षातील कार्यकर्त्यात जोश निर्माण झाला असून निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

Related Posts
1 of 2,482

यावेळी सुभेदार पांडुरंग शिरसाट, सरपंच कॅप्टन एस एम काळवाघे, बुलढाणा, सुभेदार अजित निंबाळकर, कोल्हापूर, कॅप्टन बाबू गोविंद पोळके, सोलापूर, सुभेदार, सुधीर शिंदे, सातारा, हवालदार पोपट पडवळ, शिरूर, नायब सुबे. संदीप देसाई, सातारा, हवालदार देविदास मुंडे, बीड, हवलदार अजीत काटे, बारामती, पुणे, शिपाई विशाल जाधव, दौंड, हवालदार अनिल फुंदे, सुभेदार किसन भोबाड, माजी सैनिक विजय सिरसाट, माजी सैनिक, कृष्णकांत शिरसाट, माजी सैनिक, विष्णुपंत हांगे, माजी सैनिक शिवाजी काळे, माजी सैनिक शंकर शिरसाट,माजी सैनिक अभिजित बेळगे, माजी सैनिक महादेव शिरसाट, माज़ी, सैनिक मूढ़े तातेराव देवीदास, नगर, माज़ी सैनिक चंद्रकांत देवड़े, नगर, सुभेदार प्रवीण येवले, सातारा, सुभेदार सुरेश उमाप, शिरूर, पुणे, हवलदार राजेन्द्र धुमाल, शिरूर,पुणे, हवलदार शहाजी धुमाल,शिरूर,पुणे हवलदार विलास शिवले, शिरूर, पुणे माज़ी सैनिक जयदीप घोलप, हवेली,पुणे आदी अनेक माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: