
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका मानला जातो त्यामुळे तालुक्यात कसली जरी निवडणूक लागली तरी त्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच नेतेमंडळी आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसून येतात श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमितीची निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तालुक्याचे राजकीय वातावरण तापणार आणि पुन्हा जनतेला नेत्यांमधली राजकीय सुंदोपसुंदी पाहायला मिळणार हे मात्र निश्चित
मागील काही महिन्यांपासून प्रशासक नियुक्त असलेल्या श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे एक महिन्याने म्हणजेच दि.२८/०४/२०२३ रोजी श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमितीच्या एकूण १८ जागांसाठी मतदान होणार आहे सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी (२१२३) मतदार ग्रामपंचायत मतदारसंघ- ४ जागांसाठी (८९३)मतदार व्यापारी मतदार संघ-२ जागांसाठी(३३६) मतदार आणि हमाल,मापाडी मतदारसंघ १ जागेसाठी (१०५) मतदार असे एकूण १८ जागांसाठी ३४५७ मतदार आपला मतदानचा हक्क बजावणार आहेत दि २७/०३/२०२३ ते ३/०४/२०२३ सकाळी ११ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत दि ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे दि ६एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत
Ahmednagr news: शेतकऱ्यांचे बिल मागितल्याने कारखान्याकडून धमक्या.. पोलिस संरक्षणाची मागणी..!
दि २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप करण्यात येईल दि २८ एप्रिल ला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यत मतदान होईल
दि २९एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल अभिमान थोरात हे या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहाणार आहेत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूका होत आहेत त्यामुळे बाजारसमितीची सत्ता काबीज करून आपली ताकद वाढवण्यासाठी तालुक्यातील पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कंबर कसली आहे काही दिवसांपूर्वी झालेली खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु त्यात नेत्यांना यश आले नाही त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत ही निवडणूक लढवली खरी पण या निवडणुकीत एकत्र येऊनसुद्धा झालेले पाडापाडीचे,कुरघोडीचे राजकारण यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती त्यामुळे आता एक महिन्यानी होणाऱ्या बाजारसमिती निवडणुकीत कोण कुणासोबत लढणार कोण आपला सवता सुभा निर्माण करणार हे पाहाने औसुक्याचे ठरेल नुकताच साजन पाचपुते,बाळासाहेब नाहाटा,राहुल जगताप यांचा चर्चा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बाजारसमिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या निवडणुकीत नाहाटा,जगताप यांना साजन पाचपुते यांची साथ मिळणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत तर दुसरीकडे राजेंद्र नागवडे व आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येतात कि स्वतंत्र निवडणूक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच जेष्ठ नेते बाबासाहेब भोस व घनश्याम शेलार यांची भूमिका देखील महत्वपूर्ण असणार आहे.
शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन…. ajit pawar
चौकट/-शेतकऱ्याला सुद्धा लढवता येणार निवडणूक शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे मतदार यादीत नाव नसलेला शेतकरी सुद्धा आता बाजारसमितीची निवडणूक लढवू शकणार आहे ही निवडणूक लढवण्यासाठी सदर शेतकरी हा तालुक्यातील रहिवासी असावा त्याच्या नावे कमीतकमी १० गुंठे जमीन असावी एवढीच अट ठेवण्यात आली आहे ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघातून शेतकरी ही निवडणूक लढवू शकतो अशी माहिती श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी दिली त्यामुळे आता सामान्य शेतकऱ्याला सुद्धा निवडणूक लढवून बाजारसमितीच्या कारभारात सहभागी होता येणार असल्यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार होणार हे मात्र निश्चित