श्रीगोंदा पोलिसांनी पकडला तब्बल 9 लाखाचा गुटखा; गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रोडवरती एका पांढऱ्या पिकप मधून मोठ्या प्रमाणात गुटका वाहतूक होत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना (Shrigonda police) मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी अचानक छापा मारून तब्बल नऊ लाख 14 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी उमेश शिवाजी वेताळ वय 28 राहणार लिंपणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.