आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीगोंदा पोलिसांच्या वतीने सन्मान

0 108

श्रीगोंदा-   आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले फौजदार अंकुश ढवळे यांनी विशेष पुढाकार घेत दहावी बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या आदिवासी समाजातील दहा विद्यार्थी-विद्यार्थिनीचा सन्मान श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, दिलीप तेजनकर, फौजदार अंकुश ढवळे यांच्यासह आदिवासी पालक उपस्थित होते.(Shrigonda Police honors meritorious students from tribal community)

यावेळी प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार म्हणाल्या की, श्रीगोंदा तालुक्यातील महिला विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी गाजवत असताना आता आदिवासी समाजातील विद्यार्थिनी आणि महिलांनीही आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करावे. त्यासाठी प्रचंड प्रामाणिक मेहनतीची तयारी ठेवावी यश नक्कीच मिळतेच असे मत यावेळी व्यक्त केले. तर आदिवासी समाजावर पडलेला गुन्हेगारीचा शिक्का कायमचा पुसण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपक्रम घेतले जातात. आदिवासी भिल्ल आणि पारधी समाजातील विविध गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची परिस्थिती तशी हलाखीची असते. मात्र पोलिसांचे आदिवासी वस्तीवर सतत पडणाऱ्या छाप्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींवर मानसिक परिणाम होवून त्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू नये, शिक्षणाचे महत्व समजून घेवून उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या दहावी बारावी परीक्षेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या बारावीच्या  कु. रेखा शिवल्या काळे (८९%), कु. किशोरी नमक भोसले (७१%), तसेच दहावीच्या कु स्वाती भगवान चव्हाण (८२%), सोनाली नवनाथ गोरे (८५%), कु. राजेश्री नमक भोसले (७४%), महेश संतोष काळे (७०%), भरत अभंग भोसले (७०%), गणेश रमेश बर्डे (६०%), अनिल दिपक पवार (७९%), आकाश अनिल भोसले (६५%) या दहा विद्यार्थांचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला असल्याची माहिती पो नि रामराव ढिकले यांनी यावेळी दिली. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इंस्टाग्रामवर ओळख करून हनी ट्रॅप मध्ये व्यावसायिकाला लुटणारी टोळीला अटक

Related Posts
1 of 1,481

आजवर आमचे नातलगांनी केलेल्या गुन्ह्यामुळे आमचीही वाताहत झाली मात्र आज आमच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आयुष्यातील पहिला फोन श्रीगोंदा पोलिसांकडून आम्हाला आला याचा आनंद आम्हाला निश्चीत आहे. शिक्षणाच्या जोरावर आम्ही UPSC, MPSC सारख्या परीक्षा देवून यशस्वी अधिकारी बनून आमच्या समाजावरील गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बेलवंडी कोठार येथील रेखा शिवल्या काळे या बारावीच्या विद्यार्थिनीने यावेळी दिली.(Shrigonda Police honors meritorious students from tribal community)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: