DNA मराठी

उच्चशिक्षित पत्नीला पोटगी द्यावी की नाही ? न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

0 214
Shocking! Bogus bailiffs racket exposed; Charges filed against 17 persons

 

हरियाणा – पत्नी उच्चशिक्षित असल्यास तिला पोटगी देण्यात यावी किंवा नाही या प्रश्नांचा उत्तर आता पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका पती-पत्नीच्या वादावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.पत्नी उच्चशिक्षित असल्याचा युक्तिवाद करून तिला पोटगी देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पोटगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी पतीची याचिका फेटाळाली आहे.

एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला असून, विभक्त होणाऱ्या पती-पत्नींसाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.

अंबाला येथील पतीने याचिका दाखल करत उच्च न्यायालयात सांगितले, की त्याचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. काही काळानंतर याचिकाकर्त्याची पत्नी त्याला कारण न सांगता सोडून निघून गेली. त्यानंतर तिने अंबालाच्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला.

 

 

Related Posts
1 of 2,487

अंबालाच्या कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देत पतीला ३६०० रुपये प्रतिमहिना पोटगी देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने सांगितले, की तो एका औषधाच्या दुकानात सहाय्यकाचे काम करतो. त्याला ४००० रुपये प्रतिमहिना पगार मिळतो. पत्नीने हिंदीमध्ये एमए केले आहे. तिचे वडील वकिलाकडे क्लर्क म्हणून काम करतात. पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश योग्य नसून, तो फेटाळावा अशी मागणी पतीने केली.

उच्च न्यायालयाने मात्र पतीची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालय म्हणाले, की पतीने पत्नी आणि मुलांची देखरेख ठेवावी, ही कायदेशीर आणि नैतिकरित्या त्याची जबाबदारी आहे. पत्नी उच्चशिक्षित आहे म्हणून तिला पोटगी देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने पतीला सुनावले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: