धक्कादायक ! तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी DNA मराठी टीम
नांदेड – नांदेड रेल्वे स्टेशनवर (Nanded Railway Station) उभी असलेली तपोवन एक्सप्रेस (Tapovan Express) रेल्वे गाडीच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास घेऊन एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटने नंतर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे. हि धक्कादायक घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. (Shocking! Young man commits suicide by hanging himself from window of Tapovan Express)
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म तीनवर तपोवन एक्सप्रेस उभी होती. गाडीच्या एका बोगीच्या खिडकीला लटकून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दिसले. त्यानंतर याविषयीची माहिती तात्काळ रेल्वे स्टेशन पोलीसांना देण्यात आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय २५ वर्षांच्या आसपास असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार (Nanded police) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
दरम्यान, पोलिसांनी सदर इसमाची ओळख पटल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मयताचा चेहरा गोल, रंग सावळा, उंची साडेपाच फूट, दाढीमिशी बारीक, केस काळे, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट असा पेहराव आहे. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Shocking! Young man commits suicide by hanging himself from window of Tapovan Express)